Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूरातील विविध चोरी प्रकरणी 14 जनांना अटक, रु 67 लाख रुपये किंमतीचे वस्तू जप्त

Responsive Ad Here



 विजयपूरातील विविध चोरी प्रकरणी 14 जनांना अटक, रु 67 लाख रुपये किंमतीचे वस्तू जप्त





विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे  

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात चोरीच्या गुन्ह्यांसंदर्भात यशस्वी कारवाई करण्यात आली असून 14 आरोपींना अटक करण्यात आली आणि 67.79 लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती 

जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी  जिल्हा पोलीस कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती दिली की, 

12 घरफोडी व इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका अल्पवयीन  मुलासह एकूण 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चोरी प्रकरणी  271 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम  30 लाख , चार , दुचाकी, एक एसी असा एकूण  , 67,79,500 रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असल्याचे सांगितले., गोलगुमट ठाण्यांच्या पोलिसांनी  विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट तालुक्यातील गरगा येथील के. मुनेश रमेश हनुमंतप्पा (वय २६) याच्याकडून १० लाख रुपये आणि एक मोबाइल फोन जप्त केला आहे.

जलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरचोरीच्या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाकडून 4.80 लाख रुपये किमतीचे 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

आदर्शनगर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या घरचोरीच्या गुन्ह्यात,  ताजबावडीजवळील रॉयल मॅरेज हाॅल जवळ राहणारा आरोपी मुर्तुजसब ऊर्फ बाबा महम्मदशा खान ( वय 21) याच्याकडून 45 ग्रॅम सोन्याचे साहित्य आणि तीन  मोटरसायकल असे एकूण 5.10 लाख रुपये किमतीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरांमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी चडचण तालुक्यातील हविनाळ येथील आरोपी मोदिनसाब वालीकार याला अटक करून 172 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

आदर्शनगर पोलिसांनी आरोपी मुदस्सर ऊर्फ अब्दुल अहमद पठाण (30, रा. शक्तीनगर, विजयपुर दर्गा रोड) याला अटक केली आणि त्याच्याकडून 3 ग्रॅम सोन्याचे झुमके आणि 2500 रुपये रोख असा एकूण 14,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


आदर्श नगर पोलिसांनी विजयपूरमधील शाली हुसैनी नगर येथील आरोपी आशिफ उस्तान जमादार (३३) याला अटक केली असून एसी आणि एसी आउट डोअर युनिटसह ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शंकर मारिहाळ आणि रमण गौडा हत्ती, विजयपूर नगर डीवायएसपी बसवराज यलीगार, गोलगुमट ठाण्याचे सीपीआय मल्लया मटपती, पीएसआय सीताराम लमाणी, प्रेमा कुचाबाल, ज्योती खोत, डी एम संगापुर, सी आर सागर, एम डी घोरी उपस्थित होते.