लाडली फाऊंडेशनच्या वतीने पाच हजार स्कूल बॅग वाटपाची वचनबद्धता
स्वच्छता हा उज्ज्वल भविष्याचा पाया - शिफा जमादार
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
स्वच्छता हा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा पाया आहे, त्याच वेळी स्वच्छता हा आध्यात्मिक उन्नतीचा आणि उज्ज्वल भविष्याचा मुख्य मंत्र आहे, असे लाडली फाउंडेशनच्या प्रभारी कुमारी शिफा जमादार यांनी सांगितले.
विजयपूर शहरातील रिमांड होम येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात लाडली फाऊंडेशनच्या सहकार्याने स्कूल बॅग वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या, उच्च कामगिरीसाठी चांगले आरोग्य आवश्यक आहे, तसेच चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे.
स्वच्छता नसेल तर अनेक रोग आपल्या जीवनावर परिणाम करतात, जे आपल्या भविष्यासाठी घातक ठरतील. त्यामुळे आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता हा जीवनाचा भाग बनला पाहिजे, असे शिफा यांनी सांगितले
लाडली फाऊंडेशनने विजयपूर जिल्हा दत्तक घेतला आहे आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित सुसज्ज स्वच्छतागृहे बांधली जात आहेत.
आता विद्यार्थ्यांच्यासाठी अत्युच्च दर्जाच्या स्कूल बॅग भूमिती पेटी, स्टेशनरी आणि स्वच्छता संदर्भात पुस्तिकांचे वाटप करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, पाच हजार मुलांना स्कूल बॅग वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाडली फाऊंडेशनच्या सल्लागार डॉ. जावेद जमादार म्हणाले की, स्वच्छतेबाबत जागरुक करणे गरजेचे आहे, त्यामुळेच लाडली फाऊंडेशनच्या रुपाने देशभरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. विविध प्रकारचे स्वच्छता कार्यक्रम राबविण्याचे संकल्प करुन विजयपूरमधील सरकारी शाळांमध्ये यापूर्वीच 7 अत्याधुनिक शौचालये बांधण्यात आली आहेत, लाडली फाउंडेशनने 12 नवीन शौचालये बांधण्यासाठी आणि 12 शौचालयांच्या नूतनीकरणासाठी कार्य आराखडा तयार केला आहे.
बीआरसी मुनिर गुराड्डी, लाडली फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक युसूफ कोट्टल, समन्वयक सरिता चक्रसाली, प्रीती पत्तार युवा नेते शोएब मोमीन, यासीन सिंदगीकर, शिक्षक राजू राठोड, एल.एन. हिरेकुरुब, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
