पिंपरी चिंचवड आमदार शंकर जगताप यांचे वावीत मोठ्या उल्हासात स्वागत
वावी येथील बालमित्र आशिष सोनिमिंडे आधुनिक युगातील सुदामा.. आमदार शंकर जगताप
राम सुरसे / वावी प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे वतीने तीन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे आयोजीत केलेले होते. सिन्नर तालुक्यातील वावी हे अंतर शिर्डी पासून जवळच आहे हे ओळखून आमदार शंकर जगताप वावीत दाखल झाले.
आमदार शंकर जगताप व वावी स्थित आशीष सोनिमिंडे हे पुणे येथे कॉलेजला बरोबर होते. एकाच बाकावरती बसून शिक्षण घेतलेले हे दोघे मित्र त्यातील एक आमदार झाला तर एक वावी येथे आपले कृषी निगडीत बाबींचे मशिनरी दुकान चालवतो.
आमदार जरी झालो असलो तरी कृष्ण सुदामा घरी आला आणि सुदाम्याचे पोहे न खाताच गेला असं होणार नाही. सुदाम्याच्या घरची आठवण आयुष्यभर जपण्या जोगी राहील असे वक्तव्य आमदार शंकर जगताप यांनी तालुक्यातील वावी येथे असलेल्या जिवलग मित्रासाठी केले. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील आमदार शंकर भाऊ जगताप यांचे शालेय जीवनातील मित्र वावी येथे राहात असलेले आशिष सोनिमिंडे या मित्सत्रा भेटण्यासाठी आमदार जगताप यांचा मोह उभारून आला. मित्र हा आपल्या चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा साक्षीदार असतो म्हणून मैत्रीच नात हे इतर सगळ्या नात्यांपेक्षा वेगळ असतं.जेव्हा मैत्री या विषयावर चर्चा सुरू होते तेव्हा द्वापार काळातील कृष्ण सुदाम्याच्या मैत्रीचे उदाहरण द्यायला कृष्ण आणि सुदामाची मैत्री ही सुवर्ण अक्षराने लिहिली गेली आहे.मीही ते जोपासण्याचे काम करत आहे परंतू माझा सुदामा हा आधुनिक युगातील कर्तव्यदक्ष व सक्षम आहे त्यामुळे मला चिंता नाही. असे जगताप यांनी बोलून दाखविले.
मी माझ्या मित्रांना केंव्हाच अंतर देत नाही
माझ्या याच कामाची पावती म्हणून मी आज आमदार आहेत 1996 पासून सोनीमिंडे कुटुंब मला जोडले गेले आहेत. मी जरी आमदार आहे तरी त्याआधी माझे मित्र मला महत्त्वाचे आहेत असे सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वावी ग्रामस्थांच्या वतीने आमदार जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. वावी ग्रामस्तांचे वतीने आलेले मान्यवर राजेंद्र पिपाडा रहाता, उपमहापौर सचिन चिंचवडे पिंपरी महानगर पालिका, किर्तन केसरी हे.भ.प.पांडुरंग महाराज गिरी, भाजपाचे पक्ष नेते नामदेव ढाके, पिंपरी चिंचवडचे नगरसेवक राजेंद्र गावडे, अभिषेक बारणे, संदीप गाडे, बाबा साहेब त्रिभुवन, सागर अंघोळकर, तानाजी बारणे, देवदत्त लांडे, पोपटराव हजारे, अजय पाताडे आदींसह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.यावेळी मंदार केसकर,वनश्री राम सुरसे, वावी गावचे उपसरपंच कैलास जाजू, जयेश मालपाणी, ओमकार धूत, डॉक्टर वैभव केसकर, वैभव लढढा, अशोक गलांडे,मुलसिंग राजपूत, संतकृपा इंजिनिअरिंगचे दत्ताजी घोटेकर, विजय सोमानी, पत्रकार अजित देसाई आदींसह आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष भोपी यांनी केले.
