महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांती साजरी, दिनदर्शिकेचे प्रकाशन
विजयपुर/ प्रतिनिधी-दिपक शिंत्रे
मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्टेशन रोडवरील गॅनी कॉलनीतील श्री प्रसन्न गणेश मंदिरात प्रसन्न गणेश महिला मंडळातर्फे विशेष पूजा करून संक्रांती सण उत्साहात साजरा करण्यात आला.
याच प्रसंगी वनश्री फाउंडेशन अंतर्गत सीव्हीएस पिनाकिन इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या नूतन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. महिला मंडळाच्या सदस्य, ज्येष्ठ नागरिक व वसाहतीतील रहिवासी सहभाग झाले होते.

