दुधनी शहरात शासनांनी नाट्यगृहाला नाहरकत दिले की काय?
नाट्यगृहामुळे होतेय विद्यार्थी, बाळंतीण, वृयोवृध्दांना होतोय निद्रानाश
अक्कलकोट- तालुक्यातील दुधनी शहरात सध्या ग्राम दैवत श्री सिध्दरामेश्वर महाराज यांची जत्रा चालु आहे आणि या जत्रेची आनंद लहान लोकांपासून वयोवृद्धांपर्यंत होत आहे, त्याच बरोबर चार- पाच दिवस निद्रानाश व शारीरिक कष्ट देखील सोसावे लागत आहे.
याचे कारण असे की दुधनीत मकर संक्रांत जत्रेच्या निमित्त विना परवाना दोन नाट्यगृहे चालु आहेत आणि या नाट्यगृहाच्या उद्घाटनला मोठ- मोठ्या नेते, आमदार, पोलिस अधिकारी, काॅन्ट्रेक्टर, व्यापारी ई.लोक उद्घाटन, फोटो पुजा, कथा पुजे साठी येत आहेत आणि या लोकांचे मोठ मोठ्या पोष्टर, आमंत्रण पत्रीका देखील दिल्या आहेत.
या दोन्ही नाट्यगहेची दि.15 जानेवारी पासुन ते 18-19 पर्यंत वेळ रात्री 10:30ते पहाटे 05 पर्यंत आहे. शासनांची परवाने प्रमाणे कुठल्याही चित्रपटगृहाला किंवा नाट्यगृहाला रात्री बारा नंतर परवानगी नाही तरी या दुधनीतील दोन्ही नाट्यगृहाला रात्रभर परवानगी कोणी दिली याची चर्चा जोरात सुरू आहे. नाटक चालु होण्याआधी मोठ्या आवाजात कन्नड अश्लील गाणे लावतात याचे परिणाम लहान मुले-मुलींना होत नाही का? नाटकाची पोष्टरवर एवढ्या थोरा मोठ्या अधिकारी व नेते मंडळी यांचे नावे टाकताना शासनाची नियम व अटी नाटक मालकांना सांगितले नाही का? रात्री बारा नंतरच्या नाट्यगृहाला परवाना कोणी दिली? असे अनेक प्रश्न गावातील नागरिकांनी करत आहेत मात्र फक्त पत्रकारांसमोरच!
विद्युत महामंडळाने नाट्यगृहाला मोफत विज पुरवठा कसे केली?- सुज्ञ नागरिक
दुधनीत सर्वसामान्य पणे देवस्थानाला किंवा जत्रेसाठी ठराविक दिवसासाठी मोफत विद्युत पुरवठा केला जातो मात्र सध्या दुधनी शहरात मोठ्या प्रमाणात विज चोरी होतानाचे लक्षात घेता महावितरणांनी गावभर केबल घालुन प्रिपेड मिटर बसे पर्यंत पुढे गेले असता या असंवैधिनिक नाट्यगृहाला मोफत विज पुरवठा कसे दिली याची जाब एका सुज्ञ नागरिक विचारले आहे.
नाट्यगृहाला विरोध नाही;पण.....
दुधनी शहरात दोन मोठे जत्रा भरते एक श्री सिध्दरामेश्वर यात्रा, दुसरी हिंदु - मुस्लिम ऐक्याचे जत्रा म्हणजेच सैय्यद बाहोद्दीन पीर दर्गाचे उरुस या दोन्ही जत्रेत शासनांनी किंवा नेते मंडळी वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करु नये. सध्या चालु असलेल्या नाट्यगृहांना परवाना कोणी दिली हे सांगुन नाट्यगृहातील आवाज कमी करावी व पुढच्या वर्षी गावाबाहेर या विना परवान्याच्या नाट्यगृहांना जागा द्यावी. गणेश चतुर्थी ,गणेश विसर्जन, देवी स्थापना व देवी विसर्जन, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक, महात्मा बसवेश्वर जयंती व मिरवणूक, शिवाजी महाराज जयंती व मिरवणूक यांना कसे वेळेची बंदी आहे त्याच प्रमाणे इतर कार्यक्रम व अवैध धंदे, विना परवाना नाट्यगृहे यांना सुध्दा वेळेची बंधन करावी अन्यथा पुढील अनाहूताला शासन जवाबदार राहणार अशी जनतेकडून मागणी होत आहे.
