निवृत्त बॅंक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १० जानेवारीला मोर्चा
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
ऑल इंडिया बँक रिटायर्ड एम्प्लॉईज फेडरेशन (AIBRF) च्या विजयपूर जिल्हा घटकच्या वतीने दि 10 जानेवारी सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन सुधारणेसह विविध महत्त्वाच्या मागण्यांसाठी धरणा सत्याग्रह व मोर्चा काढण्यात येणार असल्याचे असे युनियनचे जिल्हाध्यक्ष अशोक उपाध्याय यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सर्व बँक पेन्शनर्सच्या युनियनने केलेल्या लढ्यामुळे 1993 मध्ये बँक सेवानिवृत्तांना पेन्शन सुरू करण्यात आली होती. परंतु गेल्या तीस वर्षांपासून बँक सेवानिवृत्तांच्या पेन्शनमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. याबाबत आम्ही खूप प्रयत्न केले, २०० हून अधिक खासदार, संयुक्त संसदीय समिती आणि अर्थमंत्र्यांनाअनेक वेळा भेटलो, पण काही उपयोग झाला नाही. ते केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या स्वरूपात आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
2010 नंतर निवृत्त झालेल्यांना कमी पेन्शन मिळत आहे. अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत, आमच्या संघटनेचे 3 लाखांहून अधिक सदस्य आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्यावरील कर रद्द करणे, खासगी बँकांतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासह अनेक मागण्यांसाठी अर्धा दिवस सत्याग्रह व जिल्हाधिकारांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार, अर्थमंत्री किंवा इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) यांनी पेन्शनधारकांशी थेट चर्चा करून त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद द्यावा, असे केंद्रीय जिल्हाध्यक्ष विठ्ठळ काळे यांनी सांगितले. दर दहा वर्षांनी उजळणी होत नाही, ती व्हायला हवी. जिल्ह्यातील 200 हून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी 10 जानेवारी रोजी आंबेडकर सर्कल, बसवेश्वर सर्कल, टिपूसुलतान सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर घंटेप्पागोळ यांनी सांगितले की, आमच्या मागण्या सर्व जिल्ह्यातील ग्रामीण बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही लागू झाल्या पाहिजेत यासाठी
ग्रामीण बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी एआयबीआरएफचे जिल्हा युनिट अधिकारी महादेव हलल्ली उपस्थित होते.
