बनावट नोट चलन प्रकरणी चौघांना अटक
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
बनावट नोटा चलनात आणणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १,२२,५०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.
रियाझ काशिमसाब वालिकार (वय 44, रा. वज्र हनुमान नगर), दुर्गप्पा शिवनप्पा रामरत्ती (44, रा. लिंगसुर), किरण ऊर्फ भीमप्पा रामप्पा हरिजन (25, रा. महालिंगपूर), रमेश हमनमंत सावलतोट (44, रा. कोलारजवळील होलेहनगरगी गाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दि. 28 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास शहरातील पाण्याची टाकी जवळच्या दुकानातील 500 रु. मूल्याच्या नोटा दिल्या जात असल्याच्या माहितीवरून गांधी चौक पोलिसांनी छापा टाकला. ५०० रु. दर्शनी मूल्याच्या ५ बनावट नोटा सापडल्या. तो राज्य परिवहन महामंडळाच्या मेकॅनिक असल्याची माहिती आहे.
लिंगसुरच्या दुर्गप्पा शिवनप्पा रामरत्ती यांच्याकडून ५०० रुपये. दर्शनी मूल्याच्या 20 बनावट नोटा, किरण ओर्फ भीमप्पा रामप्पा हरिजन यांच्याकडून 500 रुपये दर्शनी किमतीच्या १०० बनावट नोटा, रमेश हमनमंथ सावलतोट यांच्याकडून ५०० रुपये च्या दर्शनी मूल्याच्या 120 बनावट नोटा. असं एकून , 1,22,500 रुपयांच्या 245 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली
तपास पथकात एएसपी शंकर मारिहाळ, रमण गौडा हत्ती, डीवायएसपी बसवराज यलीगार, गांधीचौक पीएसआय प्रदिप तलकेरी, राजू ममदापुर, पीएसआय सुषमा नंदीगोन, कर्मचारी अनिल दोडामणी, राजू नायक, हे या कारवाईत सहभागी होते, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे
