Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

वडगाव जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य उपक्रम

Responsive Ad Here

  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा बक्षीस वितरण 


  वडगाव जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य उपक्रम 






राम सुरसे/ वावी प्रतिनिधी (दि.27) 


सिन्नर तालुक्यातील जि.प.शाळा वडगाव  येथे रविवार दि. 26 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वीकृती बहुउद्देशीय सेवाभावी वडगाव सिन्नर संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बालमजुरी,जागतिक तापमानवाढ: आव्हाने आणि उपाय,रासायनिक कीटकनाशकांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम,पृथ्वी वाचवा: आमची जबाबदारी,झाडे लावा - जीवन वाचवा,बालविवाह आदी प्रेरणादायी विषय विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले होते.सदर विषयांवर  विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक विचारांची मांडणी करूण निबंध स्पर्धेत भाग घेतला. 


कार्यक्रमाचे प्रमुख शाळेचे मुख्याध्यापक  बॉंबळे,ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच स्थानिक शालेय व्यवस्थापन अध्यक्ष संदीप आढाव ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी,सौ. सोनाली घोडेराव,सागर जाधव सुरेश आढाव, राजेंद्र कोकाटे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.


 निबंध स्पर्धेत लहान गटा मध्ये अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक देण्यात आले. सिद्धांत आढाव, समिक्षा शिंदे, श्रावणी आंबेकर तर मोठ्या गटात अनन्या पेढेकर, किरण वाघ,कृष्णा वाघ या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.


निबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली, तसेच राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत झाली. शाळेतील शिक्षक एन.टी खुर्चे, एस.के.कांगणे, आर.पी.दौड,जे.पी.देशमुख मॅडम, एन.पी. शिंदे मॅडम, एस. एस. घुगे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले. कार्यक्रमास पालक वर्गासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.