ऊस तोडणीच्या अँडव्हान्स पैशावरुन दोघांना मारहाण, एकास अटक
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
वीटभट्टीतील तीन कामगारांवर झालेल्या अमानुष मारहाण प्रकरण, त्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटकही केली ही घटना ताजी असतानाच आणखी एक अशाचप्रकारची घटना समोर आली आहे. ऊस तोडणीच्या पैशावरून पिता-पुत्राला वीजेचा शाॅक देऊन मारहाण करण्यात आली असल्याची घटना उघडकीस आली आहे
विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील काखंडकी गावाजवळील शेतातील घरात ऊस तोडणी कामगार पुरविणाऱ्या मुकादाम कुमार राठोड आणि त्यांचा मुलगा किरण यांना फार्म हाऊसमध्ये अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. विजयपूर तालुक्यातील मखनापूर एल टी येथील शिवलाल पवार व अन्य दोघांनी मिळून मारहाण केली असून ऊस तोडणी टोळीला कामावर पाठवण्यासाठी शिवलाल पवार याने जमीन मालकाकडून ६ लाख ॲडव्हान्स घेतले होते आणि ते पैसे कुमार व किरण यांना दिले होते. कुमार आणि किरण यांनी पैसे घेऊन कामगारांना दिले. पैसे मिळालेले कामगार काम न करता पळून गेले. त्यामुळे त्यांनी कुमार आणि किरण यांना फार्म हाऊसवर नेऊन मारहाण केली. त्याला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. त्यांना हातपाय बांधले आणि पाठीवर बेल्टने मारहाण केली. विजेचा शॉक दिल्यानंतर त्याने माझ्यावर लघवी केली असे त्यांनी सांगितले
शिवलाल पवार यांनी कुमार आणि किरण यांना दिवाळीच्या सणात 6 लाख रुपये दिले होते. कुमार आणि किरण यांनी विजयपुर शहरातील कालेबाग येथील ऊस तोडणी टोळीला ते पैसे दिले. मात्र ऊस तोडणी टोळी कामावर न येता पळून गेली. पैसे परत मिळेपर्यंत कुमार आणि किरण यांनी ट्रॅक्टर नांगर गहाण म्हणून ठेवून घेण्यात आले ही घटना उघडकीस येताच पोलीस सतर्क झाले आहेत. कुमार आणि किरण यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी बबलेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार आणि त्यांचा मुलगा किरण यांनी शिवलाल पवार आणि इतरांविरोधात तक्रार दाखल असून
बबलेश्वर पोलिसांनी शिवलालला अटक केली आहे. आणखी दोन जण फरारी असून याप्रकरणी बबलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
