कार अपघातात तीन जण जागीच ठार, दोन जखमी
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
तालुक्यातील कन्नाळ क्रॉसजवळ आज (शुक्रवार) पहाटे विजयपूर - सोलापूर एनएच 50 रोड वर कार झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.
या अपघातात जिल्ह्यातील प्रतिष्ठित श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचा संचालक मंडळाचे सदस्य विजयकुमार रेवणसिद्धप्पा औरंगाबाद (वय 42) शहरातील दरबार गल्ली निवासी अभिषेक शिवाजी सावंत (वय 33), आणि टेकडी गल्ली येथे राहणाऱ्या राजू हणमंतप्पा बिरादर (वय 35 ) अशी मृतांची नावे असून राजू भीमाशंकर कांबळे(वय39) व विशाल परशुराम पोळ (वय 34 ) हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला.
के.ऐ. 28 झेड 5360 या कार मधून पाच जण महाराष्ट्रातील सोलापूरला गेले होते परत येत असताना विजयपूर अजून १८ कि.मी. असताना कन्नाळ क्रास जवळ पहाटे पाचच्या सुमारास हा रस्ता अपघात झाला.
विजयपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना विजयपुर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

