पोलिसांनी गोळीबार करत केलेल्या कारवाईत एका दरोडेखोरास अटक, तिघे फरारी
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
गेल्या पाच सहा दिवसांपासून शहरातील जनतेची झोप उडवणाऱ्या दरोडेखोर
टोळीवर पोलिसांनी गोळीबार
केला असून एक गोळी एका दरोडेखोरास लागली तर तिघे पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत
रात्रभर दरोडेखोरावर पाळत ठेवून, कारवाई करणाऱ्या पोलिसांना अखेर यश आले आहे.
विजयपूर जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यापासून दरोडेखोरांची टोळी वेगवेगळ्या भागात दरोडा
टाकून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडलेल्या होता विजयपूर पोलिसांसाठी आव्हान असलेल्या या टोळीतील एकास जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
विजयपुर शहराजवळील टोला नाक्याजवळ पहाटे ३ वाजता पळून जाणाऱ्या दरोडेखोरावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या वर जखमी झालेल्या एकास ताब्यात घेण्यात आले
शहरातील कनकदास वसाहत येथे घरफोडी झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग करून टोलनाक्याजवळून पळून जात असताना गोळीबार करण्यात आला आणि मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असलेल्या महेशला गोळी लागली. उर्वरित तिघे फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. एका शेताजवळ दरोडेखोरांवर गोळीबार करताना अंधार असल्याने गोळी कुणाला लागली हे समजलं नाही थोडे उजाडताच पहाटे त्याच ठिकाणी शोध घेत असताना एक दरोडेखोर जखमी अवस्थेत पडलेला दिसला नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काल रात्री दरोडेखोर टोळीने विजयपूरच्या जैनापूर ले-आऊटमधील संतोष यांचा घरात घुसून त्याच्यावर चाकूने वार करून पत्नीचे सोन्याचे दागिने लुटून पळ काढला होता सर्वसामान्य नागरिकांचा मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते आव्हान स्वीकारणाऱ्या पोलिसांनी दरोडेखोरांना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार केले. कारवाई करून अखेर त्यांनी गोळ्या झाडल्यामुळे एका दरोडेखोर अटक करण्यात यश मिळविले असले तरी शहरातील लोक चिंतेत असून त्यांनी अधिक गस्त घालण्याची मागणी केली आहे.
सध्या एका दरोडेखोरास अटक करण्यात आली असून इतरांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले.

