Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

ज्येष्ठ नागरिकां साठी विविध स्पर्धाचे आयोजन

Responsive Ad Here

  


 ज्येष्ठ नागरिकां साठी विविध स्पर्धाचे आयोजन 





मुंबई/ प्रतिनिधी- सुरेश पोटे 

महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ - फेस्कॅाम मुंबई व नवी मुंबई प्रादेशिक विभागातर्फे वर्ष 2025 च्या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांचा शुभारंभ दिनांक *27 जानेवारी 2025* रोजी होणार आहे. फेस्काॅम अध्यक्ष मा. श्री.डाॅ. आण्णासाहेब टेकाळे यांच्या उपस्थितीत 

  *ज्येष्ठ नागरिक भवन*

         नेरुळ पश्चिम 

      येथे हा सोहळा संपन्न होईल. 

    त्यानंतर  एकपात्री नाट्याभिनय , द्विपात्री  नाट्याभिवाचन , कथाकथन, उतस्फूर्त वक्तृत्व, समूह नृत्य व.चित्रकला स्पर्धा या स्पर्धा त्याच दिवशी घेण्यात येतील. 

   उर्वरित स्पर्धा  म्हणजेच 

1.*कॅरम स्पर्धा*

2.*बुद्धिबळ स्पर्धा*

     या दोन्ही स्पर्धा *जेष्ठ नागरिक भवन* नेरुळ येथे *दिनांक 28 जानेवारी 2025* रोजी घेण्यात येतील.

 3.*संगीत स्पर्धा (गायन)*

    *19 फेब्रुवारी 2025* रोजी 

   *डी एस हायस्कूल सायन* येथे होतील .

 फेस्काॅम च्या सभासद सदस्यांकरिता भरविण्यात येत आहेत. सदर स्पर्धांमध्ये मुंबई व नवी मुंबई परिसरातील संघांचे सदस्य मोठ्या संख्येने भाग घेऊन त्यांच्यातील सुप्त कलागुण व उत्साह यांच्या आधारे या स्पर्धा यशस्वी करत असतात. यावर्षी निबंध व चित्रकला स्पर्धाही घेण्याचे आयोजिले आहे.  सर्व ज्येष्ठ नागरिक सभासद संघांना व्हाट्स ॲप द्वारे व लेखी कळविण्यात येईल असे फेस्कॅाम मुंबई व नवी मुंबई विभागातर्फे निवेदन प्रसारित करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत भाग घेणेसाठी अर्ज 25 जानेवारी 2025 पर्यन्त करावा, सदर स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी भाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष श्री सुरेश पोटे व स्पर्धा समितीतर्फे करण्यात आले आहे. संपर्क  अध्यक्ष सुरेश पोटे मोबा. 9322401965 यांच्याशी करावा.