Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

गोंदे शिवारात एक टन गोमांस पकडण्यात वावी पोलिसांना यश

Responsive Ad Here

  गोंदे शिवारात एक टन गोमांस पकडण्यात वावी पोलिसांना यश

 

  पाच लाख 65000 रू. किमतीचा मुद्देमाल जप्त

 




राम सुरसे/वावी प्रतिनिधी 

 

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती सिन्नर तालुक्यातील गोंदे टोल नाक्या नजीक संगणमेर कडून येणाऱ्या व समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जाणारे पीक अप वाहण पकडण्यात आले. सदर पीक अप वाहणात 1000 किलो वजनाचे गोमांस आढळून आले. सदर कार्यवाही सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस स्टेशन यांनी बुधवार दि. 15 रोजी सायं.06 वा. केली. 

वावी पोलीसांकरवी  गाडी सहित दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 





अवैद्य गोमांस वाहण्याचा  कुठलाही परवाना नसताना छुप्या मार्गाने सदर वाहतूक करण्यात येत होती. कोबी पिकाचे पानांचा उपयोग करूण या पानांमध्ये गोमांस तस्करी करणाऱ्या  पिकप एम एच 17 बीवाय 83 21 या महाल वाहतूक गाडीने हि गोमांस तस्करी करण्यात येत होती. 

संगणमेर तालुक्यातून 1000 किलो वजनाचे लहान मोठे आकाराचे प्राण्यांचे

आतड्याचे गोमांस मुंबईच्या दिशेत जाणार असल्याची खबर वावी पोलीसांना मिळताच लागलीच़ पोलिसांनी सापळा रचून फजल गुलाब शेख( 34) रा संगणमेर,सोहेल  अत्तार (28) रा.संगणमेर या दोघांना अटक केली.त्यांच्याकडील एक लाख 60 हजार रुपयांचे गोमांस दोन हजार रु. किंमतीचे कोबी पिकाचे गड्डी, चार लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची पिकप गाडी तर प्रवासामध्ये दोन भिन्न प्रकारच्या वाहन क्रमांकाच्या नंबरच्या प्लेट असा एकूण पाच लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 



वावी पोलिसांनी महाराष्ट्र गोवंश संरक्षण कायदा 1976 नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा अजय महाजन,शहाजी शिंदे, नवनाथ आडके,किरण पवार करीत आहे.