Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

जामदा प्रकल्पाचे भूसंपादन मार्गी लागणार : आमदार किरण सामंत

Responsive Ad Here

 जामदा प्रकल्पाचे भूसंपादन मार्गी लागणार : आमदार

 किरण सामंत                     





गुहागर/ प्रतिनिधी- प्रशांत चव्हाण  

 बुडीत क्षेत्रातील गेले वर्षभर रखडलेले जामदा मध्यम प्रकल्पाचे काजिर्डा गावातील  भूसंपादनाचा रखडलेला प्रश्न माननीय आमदार किरण (भैया) सामंत यांनी पुढाकार घेऊन मा. जिल्हा अधिकारी सभागृह रत्नागिरी येथे दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी प्रकल्पग्रस्त व अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. 


बैठकीमध्ये काजिर्डा गावातील प्रकल्पग्रस्त नागरिकांनी सध्याचे उपविभागीय अधिकारी यांना बदलण्याची मागणी केली कारण त्यांना तांत्रिक ज्ञान व 2013 चा कायदा याचे अपुरे ज्ञान असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन बैठक घेण्यास ते अकार्यक्षम आहेत.तसेच रत्नागिरी जिल्ह्यात आठवड्यातून एक किंवा दोन दिवसांच्या वर उपस्थित नसल्याने हे काम रखडलेले आहे. त्यामुळे प्रकल्प लांबणीवर पडत असून प्रकल्पग्रस्तांचे नुकसान होत आहे. 

त्यांच्या ऐवजी एक नवीन सक्षम अधिकारी देण्याचे विनंती प्रकल्पग्रस्ताद्वारे केली गेली. मा. आमदार किरण (भैया) सामंत यांनी अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी यांना त्वरित बदलण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे प्रकल्प मार्गी लागण्याची हालचाल सुरू झाली आहे. या रखडलेल्या प्रश्नांमध्ये स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार असल्याचे मा. आमदार किरण (भैया) सामंत यांनी सांगितले आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्तांतर्फे मा.आमदार किरण (भैया) सामंत यांना धन्यवाद दिले आहेत. 


या बैठकीला प्रकल्पग्रस्त माननीय जिल्हा अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मा. आमदार किरण (भैया) सामंत अधीक्षक अभियंता व इतर उपस्थित होते. 

भूसंपादनाचे काम मार्गी लागल्यामुळे प्रकल्पग्रस्तांकडून समाधान व्यक्त होत आहे.