पोलिसांची गाडी आली अन् ; जुन्या हफ्यात वाढ झाली
अवैध दारु व्यवसायाला पोलिसांचे पाठबळ; पोलिसांचे लक्ष वसुलीवर
दुधनी - एकीकडे सरकार गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात अनेक वेळा कठोर धोरण आखले असले तर दुसरीकडे मात्र पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारु व्यावसायिकांचे उदात्तीकरण होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस येत आहेत. परिणामी सरकारचे दुधनी पोलिसांवर नियंत्रण आहे की नाही, असा गंभीर प्रश्न दुधनीकरांना पडला आहे.
सध्या 31 डिसेंबर जवळ येत असल्याने अवैध दारु व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले असुन या व्यवसायाच्या माध्यमातून अक्कलकोट पोलिसांचे चांगलेच " अर्थकरण " होणार आहे. राज्यात अवैध दारु विक्री करणार्यांवर अनेक छापेमारीची वृत्त असताना देखील दुधनीत मात्र दारु व्यावसायिक खुले- आम विक्री करत आहेत आणि पोलिसांचे लक्ष मात्र वसुली कडे आहे.
दारू व्यावसायिक आणि पोलिस व स्थानिक गावगुंड- नेते यांचा चांगलाच ताळमेळ संबंध असल्याने पोलिस मोठ्या प्रमाणात मलई लाटत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांची गाडी आली अन् ; हफ्यात वाढ झाली
अक्कलकोट पोलिसांनी मंगळवारी दुधनीत गाडी आणली आणि सर्व अवैध दारु विक्री करत्यांची हफ्ता वाढ केली अशी चर्चा दारु विक्री करणार्यांकडुन होत आहे. गावातील लोक प्रतिनिधी पोलिसांना जाब विचारले असता जुने बाटली, जुने फोटो, जुनाच गुन्हा किंवा महिन्यातुन दोन- तीन बोगस गुन्हे देखील दाखवले जातात आणि लोकांना समाधान करुन पोलिस माघारी पाठवण्यात यशस्वी होतात.
अवैध दारु विक्री करणार्यांवर न्यायालयात कठोर कारवाई करण्याचे आदेशाचे पालन पोलिस प्रशासन करत नसल्याचे चित्र दुधनी शहरात पहायला मिळते अशी दुरावस्था झाल्याचे शोक दुधनी नागरिकांनी करत आहेत.
