श्रमिक ज्येष्ठ नागरिक संघाचा रौप्य महोत्सव संपन्न
मुंबई/ प्रतिनिधी- सुरेश पोटे
श्रमिक ज्येष्ठ नागरिक संघ, डिलायरोड, मुंबई यांचा रौप्य महोत्सवी समारंभ 2024 मोठया उत्साहात व धूमधडक्यात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नाट्य, सिने अभिनेते व दिग्दर्शक श्री प्रमोद पवार, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई नवी मुंबईचे अध्यक्ष श्री सुरेश पोटे, संघांचे सल्लागार विजय औधे, पदसिद्ध सदस्य शरद डिचोलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती व कै. विवेक खाडेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, प्रमुख अतिथी पाहुणे या सर्वांनी दीप प्रज्वलन केले.
साने गुरुजीच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. श्री शाम नाईक यांनी जाने कहाँ गये वोदिन या चित्रगीतावर स्वागतपर बहारदार नृत्य सादर केले. श्री शशी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात 19 ज्येष्ठ नागरिक 75 वर्ष पूर्ण केल्या बद्धल सन्मान करण्यात आला, त्यानंतर संघाच्या अथपासून इतिपर्यंत महनीय 10 व्यक्तींचा मारणोत्तर जीवन गौरव स्मरणिका, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कुटूंबाचा गौरव करण्यात आला तर 5 व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्काराचे वितरण फेस्कॉम मुंबई नवी मुंबई अध्यक्ष मा. श्री सुरेश पोटे व श्री शरद डिचोलकर यांच्या हस्ते करण्यात आले रौप्य महोत्सवा निमित्त स्मरणिका प्रकाशित करण्यात आली याचे प्रकाशन श्री प्रमोद पवार यांच्या हस्ते करण्यात आले ज्येष्ठानी प्रचंड उत्साह व जोश असाच कायम ठेवावा असे आवाहन ही सुरेश पोटे यांनी केले. श्री प्रमोद पवार यांनी पूर्वी मी येथेच रहात होतो मी माझ्या घरी आलो आहे संघाला रौप्य महोत्सवाच्या शुभेच्छा देतो हे कार्य अखंड सुरू ठेवा असा मंत्र दिला. संघांचे अध्यक्ष श्री गणेश पोशीरकर यांनी संघाच्या वाटचालीची बाबत सभासदांना माहिती दिली. आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

