सरत्या वर्षाची रुगणांच्या जिवाशी खेळणार्यांची मोठी बातमी
दुधनीत बोगस डाॅक्टर व मेडिकल यांचा गोरखधंदा
दुधनी - सध्या दुधनी शहरात बोगस डाॅक्टर व मेडिकल मिळून रुगणांच्या जिवाशी खेळ- खेळत आहेत. आरोग्य विभागाचे कोणताही अंकुश नसुन, वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डाॅक्टर बिनधास्तपणे दुधनी शहरात दवाखाने टाकुन रुगणांची उपचार करत आहेत.
या बोगस डाॅक्टरांमुळे अनेक लोकांची प्राण गमवावे लागले तर काही रुगणांची बोगस डाॅक्टरांमुळे अवस्था तर अशी झाली आहे की ते असुन नसल्यासारखं आहेत. " महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीकृत अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी " या चार वैद्यकीय शास्ञांची अधिकृत पदवी आहेत. नव्यानेच फिजिओथेरपी समावेश केला असुन यात आणखी वैद्यकशास्त्राचा समावेश आहे. या बोगस शास्त्र व डाॅक्टरांमुळे दुधनी व दुधनी परिसरातील खेडेगावात मोठ्या प्रमाणात बोगस डाॅक्टरांची व्यवसाय जोमात चालु आहे.
त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांनी दुधनी शहरात " बोगस डाॅक्टर शोध समिती " स्थापना करुन बोगस डाॅक्टरांवर कडक कारवाई करावी अशी अपेक्षा जनतेतुन होत आहे.
" बोगस डाॅक्टरांमुळे: मेडिकलमध्ये बनावट औषध्यांची विक्री "
दुधनी शहरात आकरा मेडिकल स्टोअर असुन काही मेडिकलमध्ये बनावट अॅटीं बायोटिक विक्री करत असल्याचे चर्चा जोरात आहे. उदा. एफ डी सी कंपनीचे झिफी सारखे औषधी विक्री होत आहे. तर काही फार्मासिस्टचे लायसन भाड्याने घेऊन, दुसरीच व्यक्ती मेडिकल चालवितो ह्या सगळ्यांची तपासणी करून त्यांचे परवाने निलंबित करावी अशी पण मागणी सुशिक्षित लोकांकडून होते आहे. व औषधांवरील तारीख संपणे, औषध खरेदीनंतर बिल न देणे, बोगस जनरिक गोळ्या- औषधे देणे अश्या अनेक प्रकारचे गैरकानुनी व्यवसाय बोगस डाॅक्टरांमुळे चालली आहे. दुधनीत रात्री कोणताही चांगले डाॅक्टर नसल्यामुळे व अनाडी लोकांना डिग्रीची माहिती नसताना तसेच कमी खर्चात उपचार होत असल्याने याची गैर फायदा बोगस डाॅक्टरांना होत आहे.
ड्रग इंस्पेक्टर, जिल्हाधिकारी, व आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी यांनी रुगणांच्या जिवाशी खेळणार्या बोगस डाॅक्टर व मेडिकल स्टोअर यांना तात्काळ कारवाई करावी व त्यांचे परवाने रद्द करावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेकडून होत आहे.
