अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ विजयपूर बंदला चांगला प्रतिसाद
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बी.आर. आंबेडकर यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दलित संघटना, विविध प्रगतीपर गट अहिंद संघटनेच्या वतीने पुकारलेल्या विजयपुर बंदच्या आवाहनाला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला.
मध्यवर्ती बसस्थानकाजवळील खासगी बसेसवर आणि अथणी रोडवरील गोदावरी हॉटेलजवळ केएसआर टीसी बसेसवर किरकोळ दगडफेकेची अनुचित घटना वगळता बंद शांततेत पार पडला.
सकाळपासून बस वाहतूक बंद होती. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानक व सॅटेलाइट बसस्थानक बसेस व प्रवाशांविना शुकशुकाट जाणवत होता .
सकाळी 10 वाजेपर्यंत शहरात मोजकेच वाहन फिरत होते. नंतर वाहनांची वाहतूकही ठप्प झाली. अमावस्येमुळे इतर शहरातील मंदिरात जाणाऱ्यांना बस आणि खासगी वाहनांविना त्रास सहन करावा लागला.
याशिवाय मुख्य बाजारपेठ शास्त्री मार्केट,सराफ बाजार, कापड बाजारातील दुकानं, हॉटेल, बंद होते तर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.
सिद्धेश्वर मंदिरापासून निघालेला निषेध मोर्चा गांधी चौक बसवेश्वर चौक मार्गे आंबेडकर चौकापर्यंत गेला.
दलित नेते राजू अलगुर,
केपीसीसी सदस्य अब्दुल हमीद मुश्रीफ म्हणाले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बी.आर. आंबेडकरांचा अवमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ देशाची माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
याच प्रसंगी अहिंदाचे नेते सोमनाथ कळ्ळीमणी, चंद्रशेखर कोडबगी, एम.सी. मुल्ला आदींची भाषणे झाली.
बीरप्पा जुमनाळ, फयाज कलादगी, नागराज लंबू, सिद्दू रायन्नवर, श्रीनाथ पुजारी, अनिल होसमनी, महादेवी गोकाक, महानगरपालिका सदस्य आरती शाहपुर, अदिवेप्पा सलगल, संगमेश सागर, मल्लिकार्जुन बटगी, डॉ. रवी बिरादर यांच्या सह हजारो संख्येने विविध संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभाग झाले होते

