Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

पथनाट्याच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता विषयी मंगळवेढा तालुक्यात जनजागृती मोहीम

Responsive Ad Here

 धान कलंजियम फाउंडेशन आणि Axis बँक लिमिटेड यांचा सामाजिक उपक्रम


   पथनाट्याच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता विषयी मंगळवेढा तालुक्यात जनजागृती मोहीम





मंगळवेढा/ प्रतिनिधी 

 धान कलंजियम फाउंडेशन आणि अक्सिस बँक लिमिटेड यांच्या समुदाय आर्थिक साक्षरता केंद्र, मंगळवेढा च्या वतीने धान फाउंडेशन च्या CEO श्रीमती उमाराणी, श्री. कथिरेसन श्री. एस. शिवानंदन आणि  सी. नागराज यांच्या मार्गदर्शनात आर्थिक साक्षरता आणि बँकेच्या सेवा विषयी माहिती सांगणारे पथनाट्य *तालुक्यातील          आंधळगाव कचरेवाडी पाठखळ लक्ष्मी दहिवडी मंगळवेढा   या 5 गावात आर्थिक नियोजन आणि अंदाजपत्र ,बचत आणि गुंतवणूक, पंतप्रधान जीवन ज्योती विमा(PMJJBY ),पंतप्रधान सुरक्षा विमा(PMSBY)तसेच अटल पेन्शन योजना(APY ), पीक विमा(PMFBY), कर्ज आणि परतफेड, डिजिटल बँकिंग, ग्राहक आर्थिक संरक्षण तसेच महिला बचत गट या विषयी पथनाट्यच्या माध्यमातून गावातील महिला, युवक, जेष्ठ, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली*.

            या पथनाट्य जनजागृती कार्यक्रमासाठी एसबीआय व्यवस्थापक सुनील बिदगरकर, धान चे विभागीय समन्वयक वैभव दरबेशवार हे प्रमुख उपस्थित होते.

हे पथनाट्य *जनशक्ती कलापथक* यांच्या माध्यमातून *मा.इलियास सिद्दीकी* यांच्या टीम कडून सादर करण्यात आले.

या पथनाट्याच्या यशस्वीतेसाठी तालुका समन्वयक दीपाली राठोड, भीम तारू, स्वरा ठवळे, सौदागर, अलका सावंत,यांनी प्रयत्न केले.