प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
रायशाचे सोनेरी यश
मुंबई/क्रिडा प्रतिनिधी- बाळ तोरसकर
नुकत्याच संपन्न झालेल्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात रायशा मनीष सावंत हिने मुलींच्या गटात शानदार प्रदर्शन करत लांब उडी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. रायशा सध्या दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. याआधी मे २०२३ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत ८ वर्षाखालील गटातही तिने सुवर्णपदक पटकावले होते.
रायशा केवळ ४ वर्षांची असतानापासून प्रशिक्षक विनायक शिर्के यांच्याकडे अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घेत आहे. प्रबोधन महोत्सवातील सुवर्ण यशाबद्दल शाळेच्या वतीने तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तिच्या यशात कुटुंबाचा मोलाचा वाटा असून, त्यांनी सतत तिचे प्रोत्साहन आणि पाठबळ दिले आहे.
रायशाच्या या यशाने शाळा आणि क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण केली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
