79वी वेस्टर्न इंडिया स्लॅम स्क्वॉश स्पर्धा
अनाहत, आकांक्षा उपांत्य फेरीत
मुंबई / क्रिडा प्रतिनिधी - बाळ तोरसकर
दोन वेळची विजेती भारताच्या अनाहत सिंगसह अव्वल मानांकित आकांक्षा साळुंखेने 79व्या वेस्टर्न इंडिया स्लॅम स्क्वॉश स्पर्धेत महिला एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
प्रोफेशनल स्क्वॉश असोसिएशनची (पीएसए) चॅलेंजर स्पर्धा असलेली ही स्पर्धा सीसीआय कोर्टवर सुरू आहे. शुक्रवारी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत 16 वर्षीय अनाहतने आठव्या मानांकित भारताच्याच अंजली सेमवालचा 11-3, 11-7 आणि 11-7 असा पराभव केला.
अव्वल मानांकित आकांक्षानेही अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवताना हाँगकाँगच्या स्झे विंग वाईचा सलग तीन गेममध्ये 11-5, 11-4, 11-3 असा पराभव केला.
पुरुष गटात, अव्वल दोन मानांकित झेक प्रजासत्ताकच्या व्हिक्टर बायर्टस आणि मलेशियाच्या अमीशेनराज चंदरन यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित व्हिक्टरने सातव्या मानांकित हाँग कोमगच्या वायलोकवर 11-6, 11-3, 11-5 आणि मानांकित अमीशेनराज चंदरनने पाचव्या मानांकित इजिप्तच्या यासिन शोहदीवर 11-6, 11-2, 11-5 असा विजय मिळवला.
निकाल - पुरुष एकेरी (उपांत्यपूर्व फेरी): 2-अमिषनराज चंदरन (मलेशिया) विजयी वि. 5-यासिन शोहदी (इजिप्त) 11-6, 11-2, 11-5; 6-वीर छोटरानी (भारत) विजयी वि. 3-रविंदू लकसिरी (श्रीलंका) 11-7, 10-12, 11-9, 11-4; 4-रोवन डॅमिंग (नेदरलँड) विजयी वि. राहुल बैठा (भारत) 11-8, 11-5, 11-13, 11-6; 1-व्हिक्टर बायर्टस (चेक रिपब्लिक) विजयी वि. 7-वैलोक टू (हाँगकाँग) 11-6, 11-3, 11-5.
महिला एकेरी (उपांत्यपूर्व फेरी): 2-अनाहत सिंग (भारत) विजयी वि. 8-अंजली सेमवाल (भारत) 11-3, 11-7, 11-7; 3-नूर खफगी (इजिप्त) विजयी वि. 6-वोंग पो युई कर्स्टी (हाँगकाँग) 11-8, 11-3, 11-9; 5-जाना स्वाइफी (इजिप्त) विजयी वि. बोबो लॅम (हाँगकाँग) 4-11, 11-6, 11-5, 11-8; 1-आकांक्षा साळुंखे (भारत) विजयी वि. स्झे विंग वाई (हाँगकाँग) 11-5, 11-4, 11-3.
