Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

लोणी काळभोर येथे भारतीय सेना दिवस साजरा

Responsive Ad Here

 लोणी काळभोर येथे भारतीय सेना दिवस साजरा 





लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर येथे ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून १ लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहेत या अनुषंगानेच भारतीय सेना दिवसा निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.वड,जांबुळ, फणस, करंज, खैर, कडूनिंब, अशा जंगली वृक्षांची लागवड मेजर मोहम्मद मुजावर साहेब 

यांच्या हस्ते करण्यात आले. 

या वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री.वैभव मोरे साहेब, पोलीस अंमलदार राठोड साहेब ,चव्हाण साहेब, देविकर साहेब, वणवे साहेब, तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप, श्री.अक्षय प्रदान, सचिन कांबळे ,सिद्धार्थ खंडागळे उपस्थित होते. 

भारतीय सेना दिवस: भारतीय लष्कराची स्थापना १ एप्रिल १८९५ रोजी ब्रिटिशांनी केली. भारतीय सैन्याची स्थापना १ एप्रिल रोजी झाली परंतु भारतात १५ जानेवारी रोजी लष्कर दिन साजरा केला जातो.

भारतात दरवर्षी १५ जानेवारी रोजी भारतीय सेना दिवस साजरा केला जातो. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स २०१७ नुसार, भारताचे सैन्य जगातील चौथ्या क्रमांकाचे बलवान सैन्य मानले जाते. या पॉवर इंडेक्सनुसार केवळ अमेरिका, रशिया आणि चीनचे लष्करच भारतापेक्षा सरस आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तान या यादीत १३ व्या क्रमांकावर आहे.

भारतीय सैन्याची उत्पत्ती ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातून झाली, जी नंतर ‘ब्रिटिश इंडियन आर्मी’ म्हणून ओळखली गेली आणि अखेरीस स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय सेना बनली.सुमारे २०० वर्षे ब्रिटिशांच्या गुलामगिरीनंतर १६ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशभर अराजकतेचे वातावरण होते, दंगली आणि निर्वासितांच्या हालचालींमुळे अशांततेचे वातावरण होते.

त्यामुळे अनेक प्रशासकीय समस्या निर्माण होऊ लागल्या आणि नंतर फाळणीच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराला परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. अशी महिती मेजर मोहम्मद मुजावर यांनी दिली