मानव सुरक्षा सेवा संघाचा सन २०२२ मध्ये निधन झालेल्या व्यक्तीनां भावपूर्ण श्रद्धांजली वाहून द्वितीय वर्धापन दिन साजरा.
आश्वी - संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील मानव सुरक्षा सेवा संघ हि संघटना सन २०२१ पासून महाराष्ट्र राज्यात नव्हे तर विविध राज्यामध्ये अन्याय अत्याचार विरोधात पीडित व्यक्तीना न्याय देण्यासाठी अनेक क्षेत्रातील हजारो सदस्यांना सोबत घेऊन सेवाभावी कार्य करत आहे. तसेच दे दान फाउंडेशन याही संस्थेच्या सलग्न साई आशीर्वाद अनाथालयांची स्थापना करण्यात आली आहे. या दोन्ही संस्थेचा १४ जानेवारी रोजी द्वितीय वर्धापन दिन होता परंतु मकरसक्रांत या सनाचे औचित्य साधून १५ जानेवारी रोजी आश्वी बुद्रुक येतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले शाळेच्या हॉल मध्ये सन २०२२ मध्ये निधन झालेल्या महाराष्ट्रातील शहीद वीर सैनिक व ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आश्वी पंचक्रोशीतील निधन झालेल्या सर्वांनाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहून साजरा करण्यात आला यावेळी संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे यांनी संघाची प्रस्तवना व आश्वी पंचक्रोशीसाठी सर्वसाधारक गोरगरीब कुटुंबासाठी व अतितातडीच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी रुग्णवाहीका सर्वांच्या सहकार्याने गावात असावी याचे महत्व उपस्थित मान्यवराना पटून दिले यावेळी कार्यक्रमासाठी कार्यक्रम अध्यक्ष पदी माजी सैनिक शिंदे सर सैनिक माळी सर सैनिक जगताप सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक विजयराव हिंगे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वासू विनायकराव बालोटे सामाजिक कार्यकर्ते मिलिंदजी बोरा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड यांचे मनोगत झाले यावेळी राष्ट्रीय सचिव भारत म्हसे राष्ट्रीय प्रवक्ते भास्कर चकोर जिल्हा सचिव अजित गाढे व पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक शैक्षणिक वकील पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन विकास भडकवाड सर यांनी केले. तर रयतचे प्रा.शहाणे सर यांनी आभार मानले.

