Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपुर पोलिसांचा विक्रम; ९.४३ कोटींचा मुद्देमाल पीडितांना परत

Responsive Ad Here



 विजयपुर  पोलिसांचा विक्रम; ९.४३ कोटींचा मुद्देमाल पीडितांना परत


**चोरीच्या व सायबर गुन्ह्यांतील सोने, चांदी, वाहने आणि रोकडचा समावेश; मंत्री डॉ. एम. बी. पाटील यांच्या हस्ते वितरण**











विजयपुर / प्रतिनिधि -दिपक शिंत्रेे 

 विविध चोरी आणि सायबर गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले सोने, चांदी, वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण ९ कोटी ४३ लाख ३४ हजार ४४७ रुपयांचा मुद्देमाल पीडितांना परत करण्यात आला. मोठ्या प्रमाणात जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्याची कामगिरी करून विजयपूर जिल्हा पोलीस विभागाने विक्रम नोंदविला आहे.


न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी विजयपूर जिल्हा पोलीस परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. एम. बी. पाटील यांच्या हस्ते पीडितांना मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.

  विविध चोरीच्या प्रकरणांमध्ये ५ कोटी २३ लाख ६६ हजार २८५ रुपयांचा, तर सायबर गुन्ह्यांमध्ये ४ कोटी १९ लाख ६८ हजार १६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हा सर्व मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.

  फेब्रुवारी २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विजयपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या सुमारे ११५ मालमत्ताविषयक गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

  यामध्ये १ कोटी ३५ लाख ९९ हजार २५० रुपयांची रोकड, ३९ लाख ९९ हजार १ रुपयांचे १.७९४ किलो सोन्याचे दागिने, २१.०८ लाख रुपयांची चांदी, ८.९१९ किलो चांदी, २१.१२ लाख रुपये किमतीच्या ४६ दुचाकी, १.२६ कोटी रुपये किमतीच्या चार चारचाकी गाड्या, शेतकऱ्यांचे मौल्यवान पंपसेट तसेच अन्य साहित्याचा समावेश आहे. चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित एकूण ५.२३ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून लाभार्थ्यांना परत केला.


 *सायबर फसवणूक : ४.१९ कोटी रुपये जप्त*


अलीकडच्या काळात यूपीआय आणि क्यूआर कोडद्वारे फसवणूक, डिजिटल अरेस्ट, बनावट गुंतवणूक व शेअर बाजारातील फसवणूक, ऑनलाइन टास्क तसेच नोकरीच्या आमिषाने नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार वाढले आहेत.

अशा प्रकारच्या २० सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आरोपींकडून फसवणूक करून मिळविलेल्या रकमेतून पोलिसांनी एकूण ४ कोटी १९ लाख ६८ हजार १६२ रुपये शोधून काढले. ही संपूर्ण रक्कम संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आली.