भीमनगर येथे ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा संपन्न
*प्रधानमंत्री अजय योजने अंतर्गत आदर्श ग्राम बनण्याच्या संकल्प*
*दुधनी (.प्रतिनिधी ) निगप्पा निबाळ
अक्कलकोट तालुक्यातील गांधीनगर सोळसे लमाण तांडा या ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा भीमनगर येथे संपन्न झाली.
या वेळी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PM-AJAY) अंतर्गत राज्यातील 28 जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या 741 गावांपैकी आपले भीमनगर गाव निवडण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक संदीप पाचंगे यांनी दिली.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PM-AJAY) अंतर्गत महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमधील निवड करण्यात आलेल्या 741 गावांमध्ये 23 जून ते 25 जून 2026 या कालावधीत विशेष ग्रामसभा व संयुक्त पडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम आयोजित करण्यात येत असून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची जनजागृती, गावांच्या विकासात्मक गरजांची ओळख, ग्राम विकास आराखडे (VDPs) तयार करणे व त्यांना ग्रामसभेची मंजुरी मिळवून देणे, ज्या गावांचे ग्राम विकास आराखडे (VDPs) तयार केलेले आहेत, त्या VDPs ना जिल्हास्तरीय समितीची अंतिम मान्यता देणे, अशी कार्यवाही होणार आहे. *ज्या गावांचे गुणांकन 70 किंवा त्यापेक्षा अधिक असेल, त्या गावांना ‘आदर्श ग्राम’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे.* तसेच आदर्श ग्राम म्हणून घोषित झालेल्या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी समन्वय साधण्यावर भर दिला जाणार असल्याचेही ग्रामसेवकांनी सांगितले.
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक शरणप्पा जन्ना, रिपाइंचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, डाटा ऑपरेटर चिदानंद शिंगे, हणमंत झळकी, लक्ष्मण लोड्डेन, गौतम झळकी, विजयकुमार धोडमनी, निर्मला गायकवाड, पत्रकार निंगप्पा निंबाळ, खाजप्पा शिंगे ऊर्फ गायकवाड, लक्ष्मण रेऊरे, रवी धोडमनी, भीमा गायकवाड व सचिन धोडमनी सह इतर ग्रामस्त उपस्थित होते.
