*नेलमूल साहित्यावर विजयपूरात राज्यस्तरीय युवा गोष्ठी संपन्न
साहित्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे आवाहन
विजयपूर / प्रतिनिधि - दिपक शिंत्रे
अखिल भारतीय साहित्य परिषद, विजयपूर जिल्हा समितीच्या वतीने ‘नेलमूल साहित्य – इतिहास, तात्त्विकता आणि प्रस्तुतता’ या विषयावर राज्यस्तरीय युवा गोष्ठीचे आयोजन करण्यात आले.
शहरातील आनंदनगर येथील भावसार क्षत्रिय सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमात कर्नाटकातील विविध भागांतून आलेल्या १५ युवा साहित्य अभ्यासकांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष एस. जी. कोटी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी बोलताना ते म्हणाले की, युवकांचा आवाज समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. युवा पिढीमध्ये अस्सल साहित्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी अखिल भारतीय साहित्य परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.
परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्या माया बालचंद्र यांनी यावेळी अतिथी म्हणून मार्गदर्शन केले.
गोष्ठीच्या समारोपप्रसंगी परिषदेचे राज्य सरचिटणीस रघुनंदन भट यांनी साहित्यामुळे मिळणाऱ्या प्रेरणेतून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे आवाहन केले. भारताचे खरे मूळ तत्त्व आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. सुमा सावंत यांनी समारोपपर भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामू यांनी केले. मयूर तिळगुळकर यांनी स्वागत केले, तर अखिल भारतीय साहित्य परिषद विजयपूर जिल्हाध्यक्ष विवेक कुलकर्णी यांनी आभार मानले. बलवंत कुलकर्णी यांनी वंदे मातरम् गीत सादर केले.
कार्यक्रमास आनंद गोडसे, युवा प्रकोष्ठ प्रमुख डॉ. राहुल मरळी, श्रीरंग कुलकर्णी, नारायण शेवरे, गणेश अडिग, सुकांत कुलकर्णी, शिवशरण गोड्राळ, श्रीरंजनी दत्तात्रि, अशोक रायकर, चंद्रिका बल्लारी, श्रीरंग पुराणिक, माधुरी कुलकर्णी, भारती गोडसे, चिदंबर पाटील, प्रिया हरिदास यांच्यासह साहित्यप्रेमी व युवा साहित्यिक उपस्थित होते.
