Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

शेतकऱ्यांच्या अश्रूची दखल घेत थेट मंत्रालयापर्यंत लढा

Responsive Ad Here

 शेतकऱ्यांच्या अश्रूची दखल घेत थेट मंत्रालयापर्यंत लढा


म्हेत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे अक्कलकोटला मिळाला दिलासा : नगरसेवक बसवराज हौदे










अक्कलकोट /प्रतिनिधि 

चालू वर्षात सलग चार महिन्यांत पाऊस न पडल्यामुळे तालुक्यात भीषण कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ओढे व नाले कोरडेठाक पडल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची उभी पिके करपून गेली, ज्यामुळे बळीराजा पूर्णपणे हताश व खचून गेला होता.अशा बिकट आणि संकटकाळात शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत,माजीमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि त्यांना धीर दिला.


पावसा अभावी पिके डोळ्यांसमोर कोमेजून जात असताना शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला होता. या अत्यंत कठीण परिस्थितीत माजी मंत्री म्हेत्रे यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली. पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधला आणि त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवत धीर दिला. तुम्ही अजिबात घाबरू नका, शासनदरबारी


पाठपुरावा करून दुष्काळ जाहीर करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला होता.


शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू म्हेत्रे यांच्या मनाला चटके देऊन गेले. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. अक्कलकोट तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाचे सर्वार्थाने साहाय्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक पाठपुराव्यामुळेच आज तालुक्यात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाल्याची माहिती नगरसेवक बसवराज हौदे यांनी दिली.


जेव्हा तालुक्यावर मोठे संकट आले होते, तेव्हा बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अश्रूची दखल घेणारे आणि शासनाकडे पाठपुरावा करणारे नेते म्हेत्रे होते. त्यांच्या याच प्रामाणिक प्रयत्नांमुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करणे शक्य झाले आहे, ही वस्तुस्थिती जनता विसरणार नाही, असेही हौदे यानी म्हणाले.