Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मोदींच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक सेवेला अभिवादन

Responsive Ad Here



मोदींच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक सेवेला अभिवादन


*विजयपूरमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात*










विजयपूर / प्रतिनिधी — दिपक शिंत्रे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक सेवेला अभिवादन करण्यासाठी शहरातील नागूर महाविद्यालयाजवळ ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात पार पडली. भाजपचे दिवंगत कार्यकर्ते बसवराज कुंभार यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाच्या व्यासपीठाला त्यांचे नाव देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.


कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ एलईडी स्क्रीनवर दाखविण्यात आले. विधान परिषद सदस्य पी.एच. पुजारी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मोदी यांच्या संघटनात्मक कार्यापासून गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि त्यानंतर पंतप्रधान म्हणून केलेल्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला. पारदर्शक व सक्षम प्रशासनासाठी मोदींचे आदर्श अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.


यानंतर ‘सेवा ज्योती’ यात्रेला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत यात्रा श्री सिद्धेश्वर मंदिरात पोहोचली. तेथे विशेष पूजा करण्यात आली. त्यानंतर गांधी चौकात यात्रेची सांगता झाली.


खासदार रमेश जिगजिणगी, भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्प अंगडी, माजी आमदार रमेश भूषणूर, सोमणगौडा पाटील सासनूर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, विविध मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्णा गुन्नाळकर यांनी स्वागत केले, तर ईरण्णा रावूर यांनी सूत्रसंचालन केले.