Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करा; जिल्हा कृषिक समाजाची मागणी

Responsive Ad Here

 


विजयपूर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करा; जिल्हा कृषिक समाजाची मागणी









विजयपूर / प्रतिनिधि -दिपक शिंत्रेे 

विजयपूर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून तातडीने घोषित करावेत, असा ठराव विजयपूर जिल्हा कृषिक समाजाच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्य सरकारकडे शिफारस करण्याची मागणी करण्यात आली.


बैठकीत बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, यंदा अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तूर, ज्वारी (गोंजाळ) तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व तालुक्यांचा दौरा करून पिकांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा. त्यानंतर संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना त्वरित दुष्काळी मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.


यावेळी भीमा नदीकाठच्या भागातही पाणीटंचाई गंभीर बनल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता निर्माण झाली असून, महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधून भीमा नदीत तातडीने पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली.


बैठकीला जिल्हा कृषिक समाजाचे अध्यक्ष शिवनगौडा बिरादार (सोमनाळ), संजय पाटील (कनमडी), शिवप्पगौडा बिरादार, दानम्मगौडती पाटील, पीरगोंडा गध्याळ, महावीर कुसनाळ, रामनगौडा पाटील, एस. एम. आनंदी, शंकरगौडा पाटील, बी. एस. मडगी, श्रीशैलगौडा पाटील, संगनगौडा पाटील (मुळवाड), एम. एस. काशिनकुंटे, निंगनगौडा पाटील, शंकर रेवडी, अयनगौडा पाटील, एम. ओ. हिरेकुरबर, एम. एस. कोकरे, जी. के. नेल्लगी, वेंकनगौडा पाटील, रमेश पुजारी, जे. के. पालके, संगमेश अंगडी यांच्यासह जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.