Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुचाकी आणि ट्रक अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

Responsive Ad Here



दुचाकी आणि ट्रक अपघातात पती-पत्नीचा मृत्यू








विजयपूर / प्रतिनिधी- 

 दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना विजापूर शहराजवळील तोरवी परिसरात घडली.

  मृतांची ओळख विजयपूर तालुक्यातील खतिजापूर एच.पी.एस. शाळेतील  शिक्षिका अंबिका पुजारी (वय ३४)आणि विजयपूर येथील चाणक्य करिअर अकॅडमीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले त्यांचे पती गुरुलिंग हुनश्याळ (वय ३७)अशी झाली आहे.


दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाचा भरधाव वेग अपघातास कारणीभूत असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

  घटनेची माहिती मिळताच विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  या दुर्दैवी घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात तसेच मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.