Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

भूकमुक्त सेवा उपक्रमाचा १०० वा आठवडा : शेकडो निराधारांना मोफत अन्नदान

Responsive Ad Here



भूकमुक्त सेवा उपक्रमाचा १०० वा आठवडा : शेकडो निराधारांना मोफत अन्नदान







विजयपूर / प्रतिनिधी-दिपक शिंत्रे 

* देश रक्षकर पडे संचलित अन्न स्नेही सेवा संघाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “भूकमुक्त सेवा उपक्रमाचा” १०० वा आठवडा आज यशस्वीपणे साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये  बसस्थानकावर प्रवास करणारे प्रवासी, सरकारी हॉस्पिटल परिसरात रुग्णांच्या  नातेवाईकांना, निराधार आणि बेघर नागरिकांना मोफत गरम भोजनाचे वाटप करण्यात आले.


या उदात्त अन्नदान उपक्रमांतर्गत जिल्हा सरकारी रुग्णालय परिसर, केंद्रीय बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच शहरातील प्रमुख चौकांच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या शेकडो गरजू नागरिकांना देश रक्षकर पडेच्या स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष भेट देऊन सन्मानपूर्वक तयार केलेले भोजन वितरित केले.


या कार्यक्रमाला महानगरपालिका उपआयुक्त महावीर बोरण्णवर, प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. बाबू राजेंद्र नायक, महानगरपालिका सदस्य शिवरुद्र बागलकोट, राहुल जाधव आणि बंदेनवाज बीळगी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक रोहन आपटे यांनी सांगितले की, “मानवसेवा हीच माधवसेवा या ध्येयाने अन्न स्नेही सेवा संघ सातत्याने समाजोपयोगी कार्य करत आहे. भुकेल्यांना अन्न देण्यापेक्षा श्रेष्ठ सेवा दुसरी नाही.”


संस्थेचे अध्यक्ष आकाश इंडी म्हणाले, “भुकेल्यांना अन्नदान करणे ही सर्व श्रेष्ठ सेवा हा उपक्रम दीर्घकाळ टिकवून ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आगामी काळातही अशा मानवतावादी सेवा अखंडपणे सुरू राहतील.”


या उपक्रमात देश रक्षकर पडेचे विक्रम तांबेकर, जगदीश रुगीमठ, किरण कुलूरगी, शशी, सुजित, कृष्णा, शशिधर, मुत्तू, मैबूब, मुस्ताक, शांतू, संतोष, महांतेश, प्रकाश, विनायक, सागर, वीरेश, विनोद पत्तार यांच्यासह अन्न स्नेही सेवा संघाचे सदस्य, स्थानिक मान्यवर आणि उपस्थित नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून अन्न वितरणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.