Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सोनार समाज संस्था, सोलापूर ला "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड 2026" जाहीर

Responsive Ad Here

 सोनार समाज संस्था, सोलापूर ला "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड 2026" जाहीर

अध्यक्ष वसंत पोतदार यांच्या नेतृत्वातील कार्याची राष्ट्रीय दखल









सोलापूर/ प्रतिनिधी-

 महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक "अहिल्याराज" वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड 2026" साठी सोनार समाज संस्था, सोलापूर या सामाजिक संस्थेची निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्थेला हा राष्ट्रीय सन्मान जाहीर झाला आहे.


संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. वसंत पोतदार, उपाध्यक्ष श्री. विजयकुमार पोतदार व सचिव श्री. दत्तगुरु वेदपाठक यांच्या नेतृत्वाखाली संस्था गेली अनेक वर्षे समाजसेवेचे व्रत पाळत आहे. संस्थेचे अग्रणी प्रवर्तक सर्वश्री मोहनराव मंद्रूपकर, संजयजी मैदर्गीकर, संतोषजी कळमणकर,सह सचिव गिरीश जमखंडीकर, खजिनदार गजानन सोनार, संचालक इंजिनिअर विजयकुमार पोतदार, इंजिनियर रुद्रप्पा दोडमनी, प्रा. डॉ. अमर दीक्षित सर, सौ. चित्रा पोतदार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने संस्थेचे कामकाज सुरु आहे.


सोनार समाज संस्था ही नोंदणीकृत व पारदर्शक संस्था असून, केंद्र शासन, नीती आयोगाची DARPAN ID प्राप्त केलेली आहे. त्यामुळे संस्था CSR निधीसाठी देखील पात्र ठरली आहे.


संस्थेमार्फत दरवर्षी राज्यस्तरीय मोफत वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यासोबतच कर्तृत्ववान समाज बांधवांचा गुणगौरव करून त्यांना सन्मानित केले जाते. गेल्या वर्षी वधू-वर मेळाव्यास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे, समाज बांधवांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचावी यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. 


श्री. संत नरहरी आर्थिक विकास महामंडळ, विश्वकर्मा कौशल्य विकास योजना,  पंतप्रधान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम - CM, PM.EGMY आदी योजनांची सविस्तर माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत समाज बांधवांना देण्यात आली. असा उपक्रम राज्यात इतरत्र कोठेही राबविला नसल्यामुळे उपस्थित बांधवांनी संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व गौरवोद्गार काढले.


संस्थेच्या या सर्व समाजोपयोगी उपक्रमांची दखल घेऊन "दैनिक अहिल्याराज" ने "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड 2026" हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे. 


संस्थेसमोरील सध्या एकमेव अडचण जागेची आहे. समाजासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थेने समाजातील दानशूर व्यक्ती व उद्योजकांकडे मदतीचा हात मागितला आहे.


या पुरस्काराबद्दल अध्यक्ष वसंत पोतदार म्हणाले, "अहिल्याराज सारख्या अग्रगण्य वृत्तपत्राने आमच्या कार्याची दखल घेतली, हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. यापुढेही 'शिक्षण। सहकार। प्रगती।' या ब्रीदवाक्याने समाजाच्या उन्नतीसाठी आमचे कार्य अविरत सुरू राहील."