प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यावरील टिका निषेधार्थ - रविकांत पाटील
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
इंडी आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वर केलेली टिका निषेधार्थ असल्याचे
माजी आमदार रविकांत पाटील यांनी सांगितले
शहरातील प्रवासी मंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशात अनेक विकासकामे झाली आहेत. गाव आणि शहरांमध्ये पूल, रस्ते यांसारख्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देश आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सैन्यदलाला अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडेच एका गावातील सभेत बोलताना आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना रविकांत पाटील म्हणाले की, “मी तीन वेळा आमदार झालो असलो तरी कोणत्याही अधिकाऱ्यांना धमकी दिलेली नाही. भीमाशंकर साखर कारखान्यात मेंटेनन्सच्या नावाखाली ४०० कोटी रुपयांचे कर्ज करण्यात आले आहे. त्यांच्या प्रशासनात भ्रष्टाचार भरलेला आहे. हे जिल्ह्यातील जनतेला चांगलेच माहिती आहे, “निवडणुकीनंतर आपण चार वर्षे मतदारसंघाकडे फिरकलेही नाहीत.” असा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रविकांत पाटील म्हणाले गेल्या तीन वर्षांपासून माझी तब्येत ठिक नव्हती बेड रेस्ट वर होतो आत्ता आराम आहे लवकरच इंडी शहरात संपर्क कार्यालय सुरू करून येथेच राहणार असल्याचे स्पष्ट केले
यावेळी जगन्नाथ इंडी, बालू गणुरे, शंकरगौडा पाटील, भीमरायगौडा बिरादार, सिकंदर बोरामणी, मुन्नागौडा पाटील, अशोक केकेरु मळप्पा पुजारी , गंगाराम क्षत्रिय, प्रशांत होसमनी, रमेश बिरादार आदी उपस्थित होते.
