Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर जिल्ह्यास केंद्राकडून 153 कोटी रुपयांची मंजुरी

Responsive Ad Here



विजयपूर जिल्ह्यास केंद्राकडून 153 कोटी रुपयांची मंजुरी

  *खासदार रमेश जिगजिणगी यांची माहिती*







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

केंद्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षात विजयपूर जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी नाबार्डच्या आरआयडीएफ अंतर्गत 153 कोटी रुपयांची मंजुरी दिली असल्याची माहिती खासदार रमेश जिगजिनगी यांनी दिली.

  यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देताना त्यांनी सांगितले की, 2025-26 या वर्षात विविध विकास योजनांसाठी कमी व्याजदराच्या कर्ज सहाय्याच्या स्वरूपात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (RIDF) अंतर्गत विजयपूर जिल्ह्यास 153.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

  इंडी तालुक्यात औद्योगिक आधारित डिप्लोमा, पोस्ट-डिप्लोमा आणि एम.टेक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जिल्हा सरकारी टूल अँड ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्यासाठी 70 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. असेही त्यांनी सांगितले.

    सिंदगी येथे कोल्ड स्टोरेज, तोरवी येथे नवीन एपीएमसी आवार व पायाभूत सुविधा तसेच ताळिकोट एपीएमसीमध्ये सिमेंट रस्ते बांधण्यासाठी आरआयडीएफ अंतर्गत एपीएमसींना 34.20 कोटी रुपयांचे कर्ज सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

   मुद्देबिहाळ तालुक्यातील इंगळेरे आणि मडिकेश्वर येथे दोन पशुवैद्यकीय रुग्णालयांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच उद्यान विभागांतर्गत आलमेल येथे उद्यान महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आणि विजयपूर येथे मनुका व सुक्या द्राक्षांसाठी सामान्य सुविधा केंद्राचे तंत्रज्ञान उन्नतीकरण करण्यासाठी 48.6 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे खासदार रमेश जिगजिणगी यांनी सांगितले.

   आरआयडीएफ व्यतिरिक्त, नाबार्डच्या पायाभूत सुविधा विकास सहाय्यता निधी अंतर्गत विजयपूर जिल्ह्यात  6 अतिरिक्त उपकेंद्रे स्थापन करण्यासाठी कर्नाटक विद्युत प्रसारण निगम लिमिटेडला 80.54 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. 

   मार्च 2026 पर्यंत केंद्र सरकारने नाबार्डमार्फत विजयपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या 40 आरआयडीएफ योजनांना मदत केली असून, जिल्ह्यातील विविध विभागांना 280.4 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असल्याचे खासदार रमेश जिगजिणगी यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.