Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेवजी जानकर यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त बादोले बु येथे ७२ जणांचे रक्तदान

Responsive Ad Here

 राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेवजी जानकर यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त बादोले बु येथे ७२ जणांचे रक्तदान







अक्कलकोट /  प्रतिनिधी - दत्ता माढकर 

 राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त मौजे बादोले बु.  दलित वस्ती समाज मंदिर कुरनूर रोड येथे शुक्रवार दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे ७ वे वर्ष असून सदर रक्तदान शिबीराचे उद् घाटन माजी पंचायत समिती सदस्य मल्लिकार्जुन हत्ते यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी अक्कलकोट नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अविनाश मडिखांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून रासपचे सोलापूर जिल्हा युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष साहिल बंडगर, रिपाईचे अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष प्रकाश गडगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष शांतकुमार सलगरे, रासपचे बादोले शाखा अध्यक्ष पांडुरंग सलगरे, बादोल्याचे माजी सरपंच बाजीराव खरात, विठ्ठल खरात, शिवशंकर कत्ते, रेवणसिध्द सरवदे, अनिल धायगोडे, बालाजी धायगोडे, लाला नदाफ,सिध्दाराम बिराजदार, धनराज बिराजदार, अकबर भाईजान, तानाजी सोलंकर, उत्कर्ष कुलकर्णी, राम मदने, म्हाळू धर्मसाले यांच्या सह आदी उपस्थित होते. यावेळी सदर रक्तदान शिबीरात ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी बोलताना अक्कलकोट नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अविनाश मडिखांबे म्हणाले की ऐन उन्हाळ्यात बादोले बु सारख्या गावातील युवक मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात ही अभिमानाची बाब आहे. कोरोनाच्या वेळी रक्ताच्या बाटल्यांचा तुटवडा भासल्याने अनेकजणांना आपले प्राण गमवावे लागले होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे याची सर्वांनी गरज ओळखून रक्तदान करावे असे आवाहन केले तर माजी पंचायत समितीचे सदस्य मल्लिकार्जुन हत्ते बोलताना म्हणाले की रासपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन एखाद्याला जिवदान करण्याचे काम करत आहेत. खेडेगावात रक्तदान करण्याची संख्या अत्यल्प असताना त्यांना रक्तदानाचे महत्त्व पटवून सांगत त्यांना यामध्ये सहभागी करण्यासाठी माडकर यांचा नेहमीच पुढाकार असतो. सदर शिबीरात रक्त संकलन करण्यासाठी शिवशंभो ब्लडबँक सेंटर मोहोळ यांनी सहकार्य केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी महेश सोलंकर, सिध्दाराम सलगरे, समर्थ खरात, प्रकाश बंडगर, राजू माडकर, अनिल खरात तुळशीराम माडकर यांनी परीश्रम घेतले.