बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील सिंदगी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी विजयपूरहून सरकारी बसने प्रवास करत असताना एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे
बागेवाडी तालुक्यातील गोलसंगी येथील रहिवासी गौस हुसेनसाब लोकापूर (वय ४०) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे ओळख पटली आहे.
गौस लोकापूर हे सिंदगी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी विजयपूरहून सिंदगीकडे गेले होते. मात्र, विजयपूरहून आलेली बस परत विजयपूरकडे निघाल्यानंतर चिक्क सिंदगीजवळ तिकीटासाठी कंडक्टरने त्यांना उठवले असता ते मृत अवस्थेत आढळले. तत्काळ बस सिंदगी पोलीस ठाण्यात नेण्यात आली.
सिंदगीतील बेकिनाळ कुटुंबाशी त्यांचे नाते असल्याचे समजल्याने पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर नातेवाईकांनी येऊन मृत व्यक्ती आपल्या कुटुंबातीलच असल्याचे सांगितले असून हा आकस्मिक मृत्यू असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सिंदगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
