स्व. दिगंबर पालकर प्रतिष्ठान कराड चे विविध सामाजिक बांधिलकी पुरस्कार जाहीर
सोलापूर चे कारीकर, मंद्रूपकर, आष्टीकर, पोतदार यांचा समावेश
सोलापूर /प्रतिनिधी -
प्रतिष्ठित स्व. दिगम्बर काशिनाथ पालकर प्रतिष्ठान कराडच्या वतीने विविध क्षेत्रात योगदान असलेल्या मान्यवारासाठी समाज रत्न, समाज भूषण, चित्र महर्षी आणि वृक्ष मित्र आदी सामाजिक बांधिलकी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सोलापूर चे सर्वश्री भारतराव कारीकर, मोहनराव मंद्रूपकर, संजय आष्टीकर आणि वसंत पोतदार यांना समाज रत्न, गोविंदराव थोरात आण्णा नडशी, रवींद्र बर्डे काका कासेगाव, दादासाहेब डोर्ले व सौ शुभांगी डोर्ले सातारा, सौ विनिता धर्माधिकारी पुणे, मकरंद नाईक कराड यांना समाजभूषण व सूर्यकांत बारसकर चेन्नई, दादासाहेब सुतार कराड यांना चित्र महर्षी आणि चंद्रकांत जाधव यांना वृक्ष मित्र आदी मान्यवर यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. श्री. भारत कारीकर यांनी त्यांच्या कार्यकाळात श्री संत नरहरी महाराज समाधी मंदिर पंढरपूर ची अनेक विकास कामे मार्गी लावली असून उपाध्यक्ष श्री. मोहन मंद्रूपकर व कार्यवाहक श्री. संजय आष्टीकर यांनी मंदिर व्यवस्थापन आणि भाविकांच्या सोयीसाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच श्री. वसंत पोतदार यांनी सोनार समाज संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून केलेले कार्य आदर्शवत आहे. कराड च्या भूमीत सोलापूर च्या या चारही सुपुत्रांचा गौरव होत असल्याबद्दल संपूर्ण सोनार समाजात आणि सामाजिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबद्दल समाजात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा दि. 18 मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता श्री कृष्णाबाई मंगल कार्यालय ( नवीन ) सोमवार पेठ, कराड येथे कृष्णा विश्व विद्यापीठ कराड चे कुलपती तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना
लि. शिवनगरचे अध्यक्ष मा श्री. सुरेशराव भोसले ( बाबा ) साहेब यांच्या अध्यक्षतेखाली , कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मा. श्री.आनंदराव पाटील ( नाना ), पुणे येथील ग्रामीण साहित्यिक मा. श्री. ब. ल. पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.
