Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

३४० मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत

Responsive Ad Here



३४० मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत


विजयपूर जिल्हा पोलीसांना यश







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 जिल्ह्यात चोरीला गेलेले तसेच हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत विजयपूर जिल्हा पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. केवळ एका महिन्यात एकूण ३४० मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत.

   सुमारे ३ कोटी रुपयांच्या किमतीचे मोबाईल शोधण्यात आले असून, हे जिल्हा पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेचे द्योतक आहे. CEIR (Central Equipment Identity Register) प्रणालीच्या मदतीने या मोबाईलचा मागोवा घेऊन त्यांना जप्त करण्यात आले.

   जिल्ह्यातील २६ पोलीस ठाण्यांतील कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. बसवन बागेवाडी, इंडी, विजयपूर शहर तसेच ग्रामीण उपविभागातील पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

    याबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी सांगितले की, नागरिकांनी आपला मोबाईल हरवला की त्वरित CEIR मध्ये नोंदणी केल्यास मोबाईल लवकर शोधण्यास मदत होते.

एकूणच, नागरिकांच्या सहकार्याने आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विजयपूर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.