पॅरोलवर जाऊन फरार झालेला कैदी ताब्यात
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
पॅरोलवर सुटून तब्बल २ वर्षे १० महिने फरार असलेल्या कैद्याला विजयपूर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तो मैसूर येथे लपून बसला होता.
अटक करण्यात आलेल्या कैद्याचे नाव किरणकुमार आनंदय्या हिरेमठ (वय ३०, शिगगाव, हावेरी जिल्हा) असे आहे. त्याच्यावर दाखल गुन्ह्यात बागलकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती (३ डिसेंबर २०१७).
तो बागलकोट केंद्रीय कारागृहात शिक्षा भोगत होता. ११ ऑगस्ट २०२३ ते २३ ऑगस्ट २०२३ या कालावधीत १३ दिवसांच्या पॅरोलवर विजयपूर केंद्रिय कारागृहातून पॅरोल सुटला होता. मात्र पॅरोल संपल्यानंतर परत न आल्याने तो फरार झाला. याप्रकरणी कारागृह उपअधीक्षक डॉ. एच. जी. मंजुनाथ यांनी आदर्श नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तपास सुरू ठेवत पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि तो मैसूरमध्ये असल्याची माहिती मिळताच पथक पाठवून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली
या पत्रकार परिषदेला एएसपी रामनगौडा हट्टी, डीवायएसपी सुनील कांबळे, टी. एस. सुल्पी, तसेच सीपीआय मल्लय्या मठपती आदी अधिकारी उपस्थित होते.
