Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

निधी अभावी नाविंदगी येथील तलाठी कार्यालय ४० वर्षापासून पडझड अवस्थेत

Responsive Ad Here

 निधी अभावी नाविंदगी येथील तलाठी कार्यालय  ४० वर्षापासून  पडझड अवस्थेत









उडगी-प्रतिनिधी


 अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथील भर वेशीत  तलाठी कार्यालयाची इमारत सध्या पडझड, ओसाड, कितपत पडलेल्या जीर्ण अवस्थेत  पाहायला मिळते. गावच्या वेशीत असलेल्या पूर्वेकडे ग्रामपंचायत कार्यालय व पश्चिमेस जिल्हा परिषद उर्दू शाळा आहे. त्याच्या मधोमध तलाठी कार्यालय सज्जा आहे.गेल्या  ४० वर्षांपासून  तलाठी कार्यालयाची  इमारत पडक्या अवस्थेत आहे. ना याची नवीन बांधकाम झाली ना स्वच्छता.तलाठी कार्यालयाच्या आवारात गवत, काटेरी झाडेझुडपांचे विळखा पडल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. परिणामी या पडझड, ओसाड जीर्ण जागेत साप, विंचू, उंदीर, घुस, यांचा वावर वाढल्यामुळे लगतच जिल्हा परिषद शाळेत कधी घुसतील याचा भरवसा नाही म्हणून मुलामुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वास्तवास असणाऱ्या दुधनीकर, रामपुरे मडचणी, स्वामी, बागवान या लोकांची घरे आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्येही असुरक्षितेची भावना निर्माण झली आहे . त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ या जागेची स्वच्छता करुन या ठिकाणी तलाठी कार्यालय  सुसज्ज अशी नवीन वास्तू बांधून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




 तलाठी कार्यालयाचा कारभार ..ग्रामपंचायत कार्यालयामधून ..


गेल्या  तीस वर्षापासूनच नाविंदगी गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय नसल्याने त्याचा कारभार ग्रामपंचायत कार्यालय मधूनच चालतो .तलाठी कार्यालयाच्या परिसरात बस स्टँड, ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषदेच्या उर्दू व कन्नड शाळा, हनुमान मंदिर मशीद, हॉटेल्स ,पोस्ट ऑफिस इत्यादी महत्त्वाचे ठिकाणे आहेत. अनेक वर्षांपासून तलाठी सज्जा व पोस्ट ऑफिसचा कारभार ग्रामपंचायत कार्यालयामधून चालतो.यादरम्यान येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होते .त्यामुळे ग्रामपंचायतच्या कार्यालयाबाहेर नागरिकांना ताटकळत  उभे राहावे लागते.ग्रामस्थांच्या होणाऱ्या गैरसोय बाबतीत ग्रामपंचायतने वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदनाद्वारे तलाठी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकाम व स्वच्छता संदर्भात महसूल विभागाला कळविले आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतल्याची दिसत नाहीत.

तलाठी कार्यालयाला स्वतंत्र जागा उपलब्ध असूनही. त्याची बांधकाम व स्वच्छता होत नसल्याने ग्रामस्थांमधून उलटसुलट चर्चा व संताप व्यक्त केली जात आहे.





तहसीलदार विनायक मगर  यांच्यासमोर  तलाठी कार्यालय संदर्भात मी अनेकदा तोंडी  गाऱ्हाणी मांडली आहे.त्याच बरोबर लेखी पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. परंतु त्यांच्याकडून  निधी उपलब्ध नाही असे सांगण्यात येते.


 पंडित चव्हाण , सरपंच-नाविंदगी ग्रामपंचायत.