काँग्रेस आमदाराला केईबी कर्मचाऱ्यांकडून “करंट शॉक”
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर येथे उन्हाळ्याच्या काळात आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. नागठाण मतदारसंघाचे आमदार विठ्ठल कट्कदोंड यांच्या सरकारी कार्यालयाचे सुमारे १ लाख ४७ हजार रुपयांचे वीज बिल थकीत होते. हे बिल हेस्कॉमला भरायचे होते, मात्र गेल्या एका वर्षापासून पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी ते भरले नव्हते.
पीडब्ल्यूडी अंतर्गत येणाऱ्या या कार्यालयाचे बिल न भरल्यामुळे केईबी कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा तोडला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात वीज नाही.
उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात पंख्याविना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आमदारांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही यामुळे मोठी गैरसोय होत आहे. पंख्याची हवा नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून, वीज नसल्यामुळे कार्यालयीन कर्मचारी अंधारात काम करत आहेत.
