Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूरात रस्त्याच्या कामगिरीमुळे वाहतूक कोंडी, वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी

Responsive Ad Here



विजयपूरात रस्त्याच्या कामगिरीमुळे वाहतूक कोंडी, 

वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी








विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

शहरातील सराफ बाजारातील रस्त्याच्या कामातील विलंबामुळे नागरिकांना वाहतुकीत मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत भाजप शहर मंडळाच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

   नेतृत्व करणारे भाजप शहर मंडळ अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले की, सराफ बाजारातील रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. शहराच्या हृदयभागात असलेला सराफ बाजार अनेक मार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे येथे दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.

   शहराच्या मध्यवर्ती भागातील सराफ बाजारात सुरू असलेल्या रस्ता कामामुळे पर्यायी मार्ग म्हणून मिलन रोडवरून वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र मिलन हॉटेलपासून जिनगर गल्लीतील हनुमान मंदिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत. तसेच व्यापारी आपल्या दुकानांसमोर रस्त्यावर लोखंडी स्टँड ठेवून वस्तू मांडत असल्याने त्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

   म्हणून तात्पुरत्या स्वरूपात त्या भागातील पार्किंग बंद करून योग्य ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी, तसेच व्यापाऱ्यांनी रस्त्यावर वस्तू ठेवू नयेत यासाठी कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

   त्याचप्रमाणे गांधी चौक ते सिद्धेश्वर मंदिर मार्गे बी.एल.डी.ई. रुग्णालयाकडे जाणाऱ्या एकमार्गी रस्त्यालगतची चारचाकी पार्किंग तात्पुरती बंद करून तो रस्ता एकमार्गी ऐवजी दुतर्फा वाहतुकीसाठी खुला करावा, जेणेकरून नागरिकांना सोय होईल, अशीही मागणी करण्यात आली.

   या आंदोलनात भीमाशंकर हदनूर, विजय जोशी, चिन्नू चिनगुंडी, विनायक दहिंडी, राजेश तावसे, राजेंद्र वाली, श्रीकांत शिंदे, गणेश उप्पार, विकास पदकी, आनंद मुच्छंडी, भरत कोळी, भरत कुलकर्णी, विवेक तावरेगिरी, संपत कोवळी, बसवराज हळी, संतोष पत्तार, अनिल उप्पार, सिद्धू मल्लिकार्जुनमठ, संगमेश उक्कली, राज इनामदार, जगदीश मनगुळी, मयूर मोरगावकर, भारती बुयार, बसम्मा गुज्जर, श्रीदेवी आवडी, शांता यळमेली आदी उपस्थित होते.