Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दोन बाईकची समोरासमोर धडक; दोघा बाईकस्वारांचा मृत्यू

Responsive Ad Here



दोन बाईकची समोरासमोर धडक; दोघा बाईकस्वारांचा मृत्यू








विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजयपूर जिल्ह्यात दोन बाईकची समोरासमोर धडक होऊन जागीच दोघा बाईकस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना बसवण बागेवाडी तालुक्यातील नागूर रस्त्यावर घडली.

   शाहिद हुबळी (वय २१) आणि संगय्या हिरेमठ (वय २४) अशी मृतांची नावे असून, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

  दोन्ही बाईक समोरासमोर धडकल्याने हा भीषण अपघात झाला असून, अतिवेग हेच या दुर्घटनेचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

  ही घटना बसवण बागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून या प्रकरणाची नोंद केली आहे.