सांगवी बु येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात...
*अखंड 12 वर्षपूर्ण तपपूर्ती नेत्रदीप सोहळा*
अक्कलकोट / प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर
तालुक्यातील सांगवी बु येथे श्री गृरुवर्य अप्पासाहेब वासकर महाराज फडा तर्फे श्री ह भ प गृरुवर्य राणा महाराज वासकर यांचे कृपाआशीर्वादाने श्री नृरसिंह जयंती निमित्त सांगवी बु येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व तपपूर्ती सोहळा आयोजित केला असून, या सप्ताह मध्ये दैनंदिन कार्यक्रम असून, दरम्यान पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 11ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन, दुपारी 2ते 3 गाथा भजन, सायंकाळी 4ते 6 हरिपाठ, सायंकाळी 6ते 7प्रवचन, रात्री 8 ते 10 कीर्तन व रात्री 11 ते 4 हरिजागर असे नित्यानेम कार्यक्रम रूपरेषा असून, या दरम्यान गावातील बाहेरगावाहून येणाऱ्या व श्रोते, वाचक यांच्यासाठी सकाळी चहा, नाष्ट, दुपारचे जेवण, संध्याकाळचे जेवण, असे नियोजन असून, गावातील अनेक आन्नदात्यांनी या सप्ताह काळात अन्नदानाचे नियोजन केले आहे.
या अखंड हरीनाम सप्ताह तपपूर्ती सोहळ्यास पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित लावण्याचे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
