Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

भारतात प्रथमच कोर्टाचा ऐतिहासिक सुनावणी ; एकाच वेळी नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा

Responsive Ad Here

 भारतात प्रथमच कोर्टाचा ऐतिहासिक सुनावणी ;


एकाच वेळी नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा 










तामिळनाडू/ मदुराई 


19 जुन 2020 रोजी मदुराई जिल्ह्यातील  साथानुकुलम गावातील पी.जयराज हा कोरोना काळात त्यांचा मोबाईल दुकान पाच ते दहा मिनिटे उशीरा चालु होता त्यामुळे साथानुकुलम स्टेशन इंचार्ज जे. श्रीधर व नऊ पोलिस अधिकारी येऊन दुकान बंद करुन जयराजला अटक करतात त्या नंतर मुलगा जे.बेनिक्स यांनी पोलिस स्टेशनला विचारपुस साठी येतो आल्यावर बाप व मुलाला पोलिस कोठडीत निर्दयपणे काठ्याने पोलिस मारतात, या मारहाणीत 22 जुन रोजी बेनिक्स याचा मृत्यू होतो तर 23 जुन रोजी वडील  जयराज चा मृत्यू झाला. 


    त्यानंतर गावातील लोक व त्यांचे नातेवाईक बंधु मिळुन कोर्टात याचिका दाखल केली आणि संपुर्ण देशभरात या बातमीची खळबळ उडाली. 

   

   या घटनेत एकुण दहा पोलिस अधिकारी होते, एक आरोपी पालदरई ऑगस्ट 2020 मध्ये कोव्हीड मुळे मृत्यू झाला तर नऊ आरोपींना 06/ 04/2026 रोजी कोर्टाने  दुहेरी फाशीची शिक्षा व दंड सुनावणी झाली आहे. 

    

या प्रकरणात पोलिसांनी दोन भागात 2427 पानांचे चार्जशीट तयार करुन या प्रकारणाची सुनावणी मदुराईचे पहिले अतिरिक्त न्यायाधीश यांच्या सत्र न्यायालयात झाली व आरोपींचा जामीन फेटाळून दिले, 23 मार्च रोजी न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले व 06 एप्रिल रोजी दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. 

  

यासारखे अनेक घटने पोलिस स्टेशन मध्ये घडतात अशी चर्चा सोशल मिडिया व इतर ठिकाणी चर्चा जोरात होत आहे.