Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूरात गोळ्या झाडून ग्रामपंचायत सदस्याची भीषण हत्या, हल्लेखोर फरार

Responsive Ad Here

 विजयपूरात गोळ्या झाडून ग्रामपंचायत सदस्याची भीषण हत्या, हल्लेखोर फरार






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात ग्रामपंचायत सदस्याचा भीषण हत्या झाल्याची घटना  विजयपूर शहरा बाहेरील अलियाबाद औद्योगिक वसाहत परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली आहे

   अलियाबाद ग्रामपंचायत सदस्य तसेच पांगारूण दोड्डी येथील रहिवासी राजू करे (वय ४८) हे मृत व्यक्ती आहेत.


राजू करे हे त्यांच्या  वाहनातून जात असताना, हल्लेखोरांनी टिपर वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर जीपवर अंदाधुंद सहा फेऱ्या गोळीबार करण्यात आला. जीपचा दरवाजा उघडत नसल्याने आरोपींनी जीपवर दगड टाकले. या भीषण हल्ल्यात राजू करे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हत्येमागे जुन्या वैमनस्याचा संशय व्यक्त केला जात आहे.



  घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला.


ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.