Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

पाय घसरून शेततळ्यात पडून युवकाचा मृत्यू

Responsive Ad Here

 पाय घसरून शेततळ्यात पडून युवकाचा मृत्यू








विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यात पाण्याच्या खड्ड्यात पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी तालुक्यातील कुबकड्डी गावाच्या बाहेरील शेतात घडली आहे. 

  कोल्हार शहरातील  वॉर्ड नंबर दोन मधील रहिवासी ईरण्णा संगप्पा टक्कळकी (वय 20) हा मृत युवक असून, तो कुबकड्डी गावाबाहेरील शेतात पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेला असताना त्याचा पाय घसरून शेततळ्यात  पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिकांनी दिली घटनास्थळी कोल्हार पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.