Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

भूतनाळ तलावात बुडून एका मुलासह दोघांचा मृत्यू

Responsive Ad Here



भूतनाळ तलावात बुडून एका मुलासह दोघांचा मृत्यू


विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

शहरातील ऐतिहासिक भूतनाळ तलाव पाहण्यासाठी गेलेल्या एका प्रवासी गटावर दुर्दैवी घटना ओढावली आहे

बेंगळुरूच्या आर.टी. नगर येथील मोहम्मद हयात (वय 12), हैदर पाशा (वय 32) आणि अब्दुल खुद्धूस (वय 35) यांचा मृत्यू झाला आहे.

  हे सर्वजण कुटुंबासह बेंगळुरूहून पर्यटनासाठी आले होते. एकूण 14 जणांचा गट विजयपूरला आला होता.


तलावाजवळ कुटुंबीय गेले असताना ही दुर्घटना घडली. मुलगा पाण्यात उतरल्यावर तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी हैदर पाशा आणि अब्दुल खुद्धूस पाण्यात उतरले, मात्र तिघेही बुडाले.

  अग्निशमन दल आणि आदर्श नगर पोलिसांनी तिघांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र मुलगा, मोहम्मद हयात आणि हैदर पाशा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.


गंभीर जखमी अवस्थेतील अब्दुल खुद्धूस यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.


घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

या प्रकरणी आदर्श नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.