जानवे काढून घेतल्याचा घटनेचा निषेध करून ब्राह्मण समाजाचे आंदोलन
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे जानवे काढून घेतल्याच्या घटनेचा निषेध करत विजयपूर शहरात ब्राह्मण समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. परीक्षेत जानवेचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी ब्राह्मण समाजाचे नेते अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले की, सीईटी परीक्षेत ब्राह्मण विद्यार्थ्यांचे जानवे काढून घेतलेल्या महाविद्यालय प्रशासनावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली
आहे. ही घटना संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणी असून, दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी खबरदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
