Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

1280 किलो अवैध रेशन तांदूळ जप्त

Responsive Ad Here



1280 किलो अवैध रेशन तांदूळ जप्त







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 


सरकारच्या विविध योजनांअंतर्गत वितरित होणारा तांदूळ अवैधरित्या वाहतूक केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. सिंदगी तहसीलदार आणि अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत अवैधरीत्या वाहतूक होत असलेला तांदूळ तसेच टाटा एेस वाहन जप्त केले.

  सिंदगी शहरातील सोमपूर रोडवर टाटा एेस मालवाहू वाहनातून तांदूळ अवैधरीत्या वाहतूक केली जात असताना अन्न विभाग आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे 1280 किलो तांदूळ जप्त करण्यात आला असून वाहन मालकाविरुद्ध सिंदगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

   या कारवाईत सिंदगी तहसीलदार करेप्पा एस. बेळी, अन्न निरीक्षक विद्या हिप्परगी तसेच प्रभुगौडा बिरादार सहभागी होते, अशी माहिती अन्न विभागाचे उपसंचालक विनयकुमार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली.